प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ात कोरोनाच्या धास्तीचा कहर वाढतो आहे. काही रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरीही नव्याने काही रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने संशयितांवर करडी नजर ठेवली आहे. तसेच आरोग्यविषयक दक्षतेसाठी कठोर पावले उचलली आहेत. आतापर्यंत तपासणी झालेल्या रुग्णांची संख्या 2156 वर पोहोचली आहे.
कोरोनासाठी आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये एकूण 1024 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. एकूण 855 स्वॅब नमुन्यांची तपासणी पूर्ण केली आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्यविषयक दक्षतेसाठी कठोर पावले उचलली असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हा आरोग्य खात्याने या आकडेवारीची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हय़ाची आकडेवारी
आजपर्यंत तपासणी झालेली रुग्णसंख्या -2156
14 दिवसांच्या क्वारंटाईनची संख्या -385
विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेली संख्या -39
14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या -708
28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या -1024
एकूण नमुन्यांची झालेली तपासणी -855
निगेटिव्ह आलेली संख्या -731
पॉझिटिव्ह रुग्ण संख्या -43
बरे झालेल्यांची (डिस्चार्ज) संख्या -3 उपचार घेणाऱयांची संख्या – 39









