बांधकाम क्षेत्रातील कंपनी : गुंतवणूकदारांना समभागाचा उत्तम परतावा
नवी दिल्ली
कल्पतरूच्या आंतरराष्ट्रीय सहकारी कंपनीला 1016 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. यासंदर्भातली माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. मंगळवारी या बातमीने कंपनीच्या समभागाच्या भावात तीन टक्के इतकी तेजी दिसून आली.
कल्पतरू प्रोजेक्टस यांचे भारतामध्ये विविध शहरांमध्ये बांधकाम प्रकल्प आहेत. याअंतर्गत त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकारी कंपनीला 1016 कोटी रुपयांचे कामाचे कंत्राट मिळाले आहे. एक ऑर्डर टी अँड डी यांच्याकडून 552 कोटी रुपयांची तर बी अँड एफ यांच्याकडून कंपनीला 464 कोटी रुपयांची दुसरी ऑर्डरही प्राप्त झाली आहे.
गुंतवणूकदार मालामाल
कल्पतरू या कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना तीन वर्षांमध्ये उत्तम परतावा मिळाला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये 234 रुपये इतक्या नीचांकी स्तरावर असणाऱ्या कल्पतरु प्रोजेक्टस्चा समभाग 160 टक्के इतका आज वाढलेला आहे.









