नवी दिल्ली
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचा अदानी उद्योग समूह पश्चिम बंगालमध्ये 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सदरच्या विविध क्षेत्रातील गुंतवणुकीच्या माध्यमातून 25 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे समूहाने म्हटले आहे. पुढील दहा वर्षांच्या काळात ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. बंदरापासून लॉजिस्टिक्स पार्कमध्ये सदरची गुंतवणूक केली जाणार आहे.









