वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हार्ले डेव्हिडसन एक्स 440 च्या दुचाकीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. या शानदार मोटरसायकलची डिलिव्हरी देशात सुरू झाली आहे. हिरोमोटो कॉर्पच्या भारतातील उत्पादन युनिटमध्ये याची निर्मिती केली जात आहे. नीमराना, राजस्थान येथे निर्मिती प्रकल्प आहे. हिरोमोटो कॉर्प ही मोटरसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे.
या कंपनीने 15 ऑक्टोबरपासून देशभरात हार्ले डेव्हिडसन एक्स 440 ची डिलिव्हरी सुरू केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच कंपनीने देशभरातील 100 डिलर्सना 1,000 दुचाकी विकल्या आहेत. या प्रत्येक बाईकची किंमत तीन लाख रुपये आहे.
हार्ले डेव्हिडसन एक्स 440 जुलै 2023 मध्ये लाँच करण्यात आली. त्याचे बुकिंग 4 जुलै रोजी सुरू झाले आणि एका महिन्याच्या आत याला 25,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले. हिरो मोटोकॉर्पचे सीईओ निरंजन गुप्ता म्हणाले की, आम्ही सणासुदीच्या पहिल्या दिवशी डिलिव्हरी सुरू केली आहे. येत्या 4-5 महिन्यांत डिलिव्हरी पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पुरवठा साखळीची क्षमता वाढवली जात आहे. आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना सेवा देऊ इच्छितो आणि त्यांचा प्रतीक्षा कालावधी कमी करू इच्छितो. छोट्या शहरांमधून या बाइकला अधिक मागणी येत आहे.
नवीन ग्राहक हार्ले डेव्हिडसन एक्स 440 ची चाचणी घेऊ शकतात. हार्ले डेव्हिडसन डिलर्सवरदेखील बुक करू शकता आणि हिरोमोटो कॉर्प आउटलेट्स निवडू शकता. तसेच, ग्राहक www.प्arतब्-अन्ग्dsदर्हे440.म्दस् वर मोटारसायकल ऑनलाइन बुक करू शकतात. सध्या ही बाईक तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. डेनिम मॉडेलची किंमत 2,39,500 रुपये, विविड 2,59,500 रुपये आणि ए ची किंमत 2,79,500 रुपये आहे.