वृत्तसंस्था/ सिद्धीपेठ
तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील एका गावाच्या बाहेर 100 हून अधिक माकडांचे मृतदेह पडलेले आढळले. रविवारी सकाळी निदर्शनास आलेल्या या प्रकारानंतर शेताकडे जात असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय विभागाला माहिती दिली. माकडांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. या माकडांना विष देऊन मारण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह येथे टाकण्यात आल्याचा संशय स्थानिकांना आहे. याप्रकरणी वनविभागाकडून अधिक तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पोलिसांनीही गावातील काही जणांची चौकशी सुरू केली आहे.









