ओटवणे / प्रतिनिधी
100 KVA power line work started in Karivade!
कारिवडेत माळकरवाडीत कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्या ठिकाणी १०० केव्हीए विद्युत वाहिनी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी कारिवडे सरपंच सौ. आरती माळकर, उपसरपंच नितिन गावडे, भाजपा आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, माजी पंचायत समिती सदस्या सौ. प्राजक्ता केळुसकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. भाग्यश्री भारमल, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख आनंद तळवणेकर आनंद परब, अनंत झिडगे, विजय माळकर, संदिप माळकर आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.