परिधान करण्यासाठी महिला होणार आतुर
महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे फूटवेअर खरेदी करण्याचा छंद असतो. याचमुळे अनेक मुली वेगवेगळी किंमत, प्रकारच्या सँडल्स परिधान करणे पसंत करतात. जगात एक अशी लेडीज सँडल आहे, जी इतकी सुंदर आहे की त्याला पाहून कुठलीही महिला खरेदी करण्यास आतुर होईल. परंतु तिची किंमत जाणून घेतल्यावर ती खरेदी करणे दूरच त्याकडे पाहण्यासही भीती वाटू शकते. ही जगातील सर्वात महागडी सँडल आहे.

2019 मध्ये इटलीतील डिझायनर अँटोनियो व्हेईत्री यांनी दुबईत जगातील सर्वात महागडी सँडल प्रदर्शित केली होती. प्रदर्शित करण्यासाठी निवडलेले ठिकाणही अत्यंत खास होते. व्हेईत्री यांनी ही सँडल जगातील सर्वात मोठी इमारत म्हणजेच बुर्ज खलिफामध्ये प्रदर्शित केली होती. याचे नाव ‘मून स्टार शूज’ असून या सँडलद्वारे ते जगातील सर्वात उंच इमारतीला मानवंदना देऊ इच्छित होते. मेड इन इटली, डिझाइन इन इमिरेट्स म्हणजेच माइड फॅशन वीकमध्ये ही सँडल लोकांदरम्यान सादर करण्यात आली होती.
या सँडलमध्ये 30 कॅरेटचे हीरे जडविण्यात आले आहेत. सँडलची हील सोन्याद्वारे तयार करण्यात आली आहे. अर्जेंटीनामध्ये 1975 च्या दरम्यान कोसळलेल्या उल्कापिंडाद्वारे या सँडलची निर्मिती करण्यात आली आहे. या सँडलची किंमत काही वर्षांपूर्वी 19.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 165 कोटी रुपये इतकी होती. व्हेईत्री यांनी 2017 मध्ये जगातील पहिला 24 कॅरेट सोन्याद्वारे बूट तयार केला होता. हे बूट खरेदी करणाऱ्या लोकांकडे ते हेलिकॉप्टरद्वारे पोहोचविले जात होते.









