ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी आपल्या वकिलामार्फत ही नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सत्तांतरानंतर संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप करत आहेत. अनेकदा त्यांच्याकडून मुख्यमंत्र्याविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकरक वक्तव्य करण्यात आली आहेत. समाजमाध्यमांवरही त्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे समाजात मुख्यमंत्र्यांचा अवमान झाल्याचा आरोप लोखंडे यांनी या नोटीसमध्ये केला आहे. यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अधिक वाचा : जनतेचा कौल भाजपच्या बाजूने नसल्यानेच मनपा निवडणूका लांबणीवर