ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादी फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून आमदारांना प्रत्येकी 100 कोटींचा निधी देण्याची डील सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे यांनी केला आहे.
दानवे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय 100 (पन्नास यंदा, पन्नास पुढील वषी) कोटींचा निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच…पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?”
राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच..
पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?#MaharashtraPoliticsCrisis
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 5, 2023
शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. आता तशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या आमदारांवरही आरोप करण्यात येत आहे. दानवे यांच्या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खोक्यांवरून घमासान होण्याची शक्यता आहे.








