कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती आणि मोहिमेत आघाडी घेतलेल्या भारताने 100 देशांना लसपुरवठा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. सद्यस्थितीत शेजारी देशांना मोफत लसपुरवठा करण्यात आला आहे. तसेच आता नजिकच्या काळात मागणी केलेल्या अन्य देशांनाही लससाठा पाठविण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
आणखी दोन लस येणार…
भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. आता लवकरच आणखी दोन लस येणार असून त्यांचाही सर्वसामान्यांच्या लसीकरणासाठी वापर करण्यात येणार आहे. वैद्यकीय कंपन्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सरकारकडूनही साथ दिली जात आहे. नव्या लसींना चाचण्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मंजुरी देण्यात येणार आहे.









