2027 पर्यंत निर्यातीचे ध्येय निश्चित : औषधांसह, अन्य घरगुती उत्पादने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्तरासह देशातील व्यापारात कार्यरत असणारी वॉलमार्ट कंपनी आपली एक योजना बनवत असल्याचे पहावयास मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट येत्या 2027 पर्यंत देशातील आपली निर्यात तीनपटीने वाढवून वर्षांकाठी 10 अब्ज डॉलर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
निर्यात करण्यामध्ये प्रामुख्याने कंपनी खाण्यापिण्याच्या वस्तू, औषधे, घरसजावट व आरोग्य क्षेत्राशी संबंधीत उत्पादने निर्यात करण्यासोबत यांचा विस्तार करणार असल्याचेही स्पष्टीकरण याप्रसंगी कंपनीकडून देण्यात आले आहे.
वॉलमार्ट सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. भारतात निर्मिती होणाऱया 10 अब्ज डॉलर्स किमतीच्या साहित्याची प्रत्येक वर्षाला आगामी 2027 पर्यंत निर्यात करण्याचे ध्येय वॉलमार्टचे राहणार असल्याचे म्हटले आहे.
एमएसएमईला मिळणार चालना
कंपनी आपल्या कार्याला अधिक मजबुती देतानाच भारतामध्ये सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील (एमएसएमई) विभागांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्राहकांना जोडण्याची तयारी
जगभरातील ग्राहक आणि समूदायांना जोडण्यासाठी येणऱया काळात वॉलमार्टचे प्रयत्न राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपनीने नाव कमावलेले असून विस्ताराचाही विचार केला जात असल्याचे वॉलमार्ट इंकचे अध्यक्ष डग मॅकमिलन यांनी स्पष्ट केले आहे.









