विवाहाच्या 10 दिवसांनी ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी 10 वर्षीय एमा एडवर्ड्स आता हयात नाही. ब्लड कॅन्सरमुळे तिचे निधन झाले आहे. एमा भले जिवंत नसली तरीही तिच्या पालकांनी तिच्या निधनाच्या 12 दिवसांपूर्वीच तिची एक इच्छा पूर्ण केली आहे आणि आता ही कहाणी प्रत्येक जण शेअर करत आहे. वधू होण्याची एमाची इच्छा होती. एमा आता फार दिवस जिवंत राहू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिच्या आईवडिलांनी तिची ही इच्छा पूर्ण केली आहे. याकरता समाज अन् मित्रांनीही मोठी मदत केली. प्रत्येक काम देणगीद्वारे पार पडले आहे.
एप्रिल 2022 मध्ये एमा स्वत:च्या घरात खेळत असताना अचानक बेशुद्ध पडली होती, पालकांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले होते, तेथे सर्वप्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यावर एमाला ‘लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया’ झाल्याचे निदान करण्यात आले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सरच असून प्रामुख्याने हा मुलांना होत असतो. एमाने देखील या उपचाररहित आजारामुळे या जगाचा निरोप घेतला आहे.
एमाच्या आईचे नाव एलिना तसेच वडिलांचे नाव एरोन एडवर्ड्स आहे. ते नॉर्थ कॅरोलिना प्रांतातील वॉलनट कोव या भागात राहतात. एमाचा कॅन्सर ज्या स्टेजमध्ये आहे, त्यात ती फारकाळ जगू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. आम्ही तिला जीवन देऊ शकत नसलो तरीही तिची वधू होण्याची इच्छा पूर्ण करू शकतो असा निर्णय घेतल्याचे एलिना यांनी सांगितले.

एमाच्या वर्गात तिचा सर्वात चांगला मित्र डॅनियल मार्शल क्रिस्टोफर विलियम्स होता. त्याला डीजे असे टोपणनाव मिळाले आहे. एमा नेहमी मला वधू व्हायचे आहे असे म्हणायची. डीजेचे कुटुंब देखील आमच्या दूरच्या नात्यातील आहे. एमा शाळेत असतानाच विवाह करू इच्छित होती, परंतु तेथील प्रशासनाने याची अनुमती दिली नाही. अखेर दोन्ही कुटुंबांनी एमाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी नकली विवाह करण्याचा निर्णय घेतला. काहीही होवो हा विवाह दोन दिवसांत करण्याचे लक्ष्य होते. एका गार्डनमध्ये विवाहसोहळा आयोजित करण्यात आला, 100 हून अधिक जणांना आमंत्रित करण्यात आल्याचे एलिना सांगितले आहे.
एलिनाच्या एका मित्राने बायबलचा हिस्सा वाचला. डीजे आता आमचा जावई आहे, तो या जगातील सर्वात सुंदर अन् चांगल्या मनाचा मुलगा आहे. तो खरोखरच स्वत:च्या मैत्रिणीवर प्रचंड प्रेम करायचा असे एलिना यांचे सांगणे आहे.
एमाज आर्मी
एमाच्या मृत्यूपूर्वी तिची कहाणी वॉलनट कोवमध्ये राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली होती. या भागात काही प्रसिद्ध कार रेसर देखील राहतात. त्यांनी स्वत:च्या वाहनांवर एमाज आर्मी लिहिलेले स्टिकर लावले. या स्टिकरसाठी सेल आयोजित करण्यात आला आणि लोकांनी अधिक किमतीत ते खरेदी केले. याचबरोबर अनेक जणांनी मोठी देणगीही दिली. प्रत्येक मूल डिस्नेलँड येथे जाऊन मस्ती करू इच्छिते, परंतु माझी मुलगी एमा तिला वधू अन् पत्नी व्हायचे होते. आम्ही तिची ही अंतिम इच्छा पूर्ण केल्याचे एलिना यांनी म्हटले आहे.









