कोल्हापूरातील शिवाजी पार्क येथील झोपडपट्यांना मोठी आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत शिवाजी पार्कातील 10 ते 12 झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या असून अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
आज सकाळीच आग लागल्याची बातमी येताच आग्निशामक दलाच्या एकूण 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शिवाजी पार्कातील झोपडपट्ट्या मधील आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आपले शर्थीचे प्रयत्न केले असून परिसरातील नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यात मदत केली. आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या आगी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. असे आग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.
Previous Articleपुन्हा सर्पदंश ; आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू …!
Next Article सावंतवाडी शहरामध्ये प्लॅस्टिक कचरा निर्मूलन मोहीम









