प्रतिनिधी,कोल्हापूर
पन्हाळा येथील संजीवन पब्लिक स्कूलचा दहावीचा (सीबीएसई बोर्ड) निकाल 100 टक्के लागला असून घवघवीत यशाची परंपरा कायम राहिली आहे.येथील बोर्डिंग आणि डे बोर्डिंग सेक्शनमधील विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन केले आहेत.यामध्ये बोर्डेंगच्या राजवर्धन पाटील याने 91 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.प्रज्ञा कुंभारने 90 टक्के गुण मिळवून डे बोर्डिंग सेक्शनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी माने (89 टक्के) द्वितीय आणि जैद जमादार आणि करण चौगले याने 87 टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक मिळवला.
अन्य गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वेदांत सुर्वे,मयांक पटेल,अथर्व गावड,प्रांजली शिंदे,यज्ञेश धापटे यांचा समावेश आहे.त्यांना स्कूलचे चेअरमन पी.आर.भोसले,सेक्रेटरी एन.आर.भोसले,बोर्डिंगचे प्राचार्य बी.आर.बेलेकर,डे स्कूलचे उपप्राचार्य पी.एन.पाटील,समन्वयक राकेश कांबळे,सहाय्यक समन्वयक मानसी कुलकर्णी, वर्ग शिक्षक बी. एम.जांभळे, सौ.एस.ए.पल्लके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणाची सोय
संजीवन स्कूलमुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दहावीनंतर जेईई, नीटसह अन्य पात्रता परीक्षेची तयारी करणे विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरत आहे
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









