एका महिन्यात जवळपास 18 लाख जणांची ईपीएफओशी जोडणी
नवी दिल्ली
जूनमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात नवीन औपचारिक नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या नियमनाखाली चालणाऱ्या संस्थांमधील नोकऱ्यांची संख्या वाढली आहे. ही संख्या 9 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ताज्या अहवालातून ही माहिती दिली आहे.
अहवालात असे सांगण्यात आले आहे, की जून 2023 मध्ये 10.14 लाख नवीन लोक ईपीएफओमध्ये सामील झाले असून ही संख्या ऑगस्ट 2022 नंतरची सर्वात जास्त आहे. त्याचवेळी, एकूण 17.89 लाख लोक ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत, जे मे महिन्याच्या तुलनेत 9.71 टक्के जास्त आहेत. तसेच गेल्या 11 महिन्यांत पाहता भरतीची संख्या सर्वोच्च पातळीवर आहे.
जूनमध्ये, 18 ते 28 वर्षे वयोगटातील सुमारे 6.88 लाख लोक ईपीएफओमध्ये सामील झाले, जे एकूण सदस्यतेच्या सुमारे 68 टक्के प्रमाण आहे. या वर्षी मे महिन्यात ही संख्या 6.17 लाख (सुमारे 66टक्के) होती. अहवालात असे म्हटले आहे, की हा डेटा देशाच्या कार्यशक्तीमध्ये तरुणांची नोंदणी दर्शवतो. यावरून असा अंदाज लावता येईल की, नव्याने रुजू झालेल्यांपैकी बहुतेक जण पहिल्यांदाच नोकरीवर रुजू झाले आहेत.
2.81 लाख महिला रुजू
ईपीएफओमध्ये एकंदर 10.14 लाख जण जून 2023 मध्ये समाविष्ट झालेले असून यात नवीन लोकांमध्ये 2.81 लाख महिला आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे. त्याचवेळी, एकूण 3.93 लाख नवीन महिलांनी झ्इिंध् मध्ये त्यांची नोंदणी केली आहे, जी ऑगस्ट 2022 नंतर पाहता सर्वाधिक मानली जात आहे.
रोजगार देण्यात आघाडीची राज्ये :
दुसरीकडे, जर आपण राज्यांबद्दल बोललो, तर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा ही नवीन नोकऱ्या देण्याच्या बाबतीत अव्वल राज्ये ठरली आहेत. या 5 राज्यांमध्ये 60.40 टक्के प्रमाण हे नव्याने प्रवेश करणाऱ्यांचे असून एकट्या महाराष्ट्रातून 20.54 टक्के नवीन उमेदवार भरती झाले आहेत, असेही समजून आले आहे.
व्यापार-व्यावसायिक, बांधकाम क्षेत्रातील नवे रोजगार
व्यापार-व्यावसायिक, बांधकाम क्षेत्रातील बहुतेक नवीन रोजगार उद्योग स्तरावर नजर टाकली तर जास्तीत जास्त लोक व्यापार-व्यावसायिक क्षेत्रात गुंतले आहेत. यानंतर, इमारत-बांधकाम, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सामान्य अभियांत्रिकी उत्पादनांच्या उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त नवे उमेदवार जोडले गेले आहेत. याशिवाय शाळा, रुग्णालये, वित्तीय संस्था, वस्त्राsद्योग यासारख्या क्षेत्रांमध्येही मोठ्या संख्येने उमेदवार नव्याने रोजगाराअंतर्गत जोडले गेले आहेत. याचा अर्थ या क्षेत्रांनी जून 2023 मध्ये सर्वाधिक नवीन नोकऱ्या दिल्या आहेत.









