वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील अलास्कामध्ये गुरुवारी 10 जणांना घेऊन जाणारे एक चार्टर्ड विमान अचानक बेपत्ता झाले. या विमानातील सर्व 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बेरिंग एअरचे हे विमान अलास्कातील उनालाक्लीट शहरातून नोम शहराकडे उ•ाण करत होते. शुक्रवारी नोम विमानतळापासून सुमारे 54 किमी आग्नेयेस विमानाचे अवशेष सापडले. अपघातग्रस्त विमानात नऊ प्रवासी आणि एक पायलट होता. विमानातील तीन मृतदेहांची ओळख पटवण्यात आल्याचे अमेरिकन तटरक्षक दलाने सांगितले.
फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाईट रडारच्या माहितीनुसार उनालक्लीट येथून उ•ाण केल्यानंतर अवघ्या 39 मिनिटांत विमान रडारवरून गायब झाले होते. गुरुवारी खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबवावी लागल्यामुळे विमानाचा शोध घेणे कठीण झाले. शुक्रवारी सकाळच्या सत्रातही विमानाचा कोणताही मागमूस सापडला नव्हता.









