वृत्तसंस्था/ मिर्झापूर
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला. येथे एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रयागराज-वाराणसी महामार्गावर कच्छवाजवळ हा अपघात झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीतून मजूर प्रवास करत असताना त्याला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा इमारतीच्या छताचे काम आटोपून घरी परतणाऱ्या कामगारांच्या वाहनाला अपघात झाला. जखमींना वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.









