विशाखापट्टणम :
आंध्रप्रदेशच्या श्री सत्यसाई जिल्ह्याच्या थुमुकुंटा गावातील एसबीआय बँकेच्या शाखेत चोरीची घटना घडली आहे. या बँकेच्या शाखेत सोमवारी रात्री चोर घुसले आणि त्यांनी 10 किलो सोने आणि 38 लाख रुपयांची रोकड लुटून नेली आहे. हे चोर सुमारे 2 तासांपर्यंत बँकेत राहिल्याचा संशय असल्याचे पोलीस अधिकारी के.व्ही. महेश यांनी म्हटले आहे.









