वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या उल्टाडांगा परिसरात रविवारी लागलेल्या भीषण आगीत किमान 10 घरे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने इतर झोपडीवजा घरांना आग लागली नाही. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण आणि झालेले नुकसान याची माहिती तातडीने उपलब्ध करण्यात आली नाही. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले.
आग लागलेल्या उल्टाडांगा भागात अनेक झोपडपट्ट्या आहेत. या घटनेच्या दोनच दिवस आधी दक्षिण कोलकाता येथील कानकुलिया रोडवरील झोपडपट्टीत आग लागली होती. आगीच्या घटनेनंतर जवळपासच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांसह बाधित लोकांना बाहेर काढण्यात आले. आग पूर्णपणे आटोक्मयात येईपर्यंत कुलिंगची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









