Satara Wai News : वाई शहरात अज्ञाताने वाहनांची मोडतोड केल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला. रविवार पेठे, राम डोह आळी,ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.सुमारे दहा वाहनांच्या काचा फुटल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. याबाबत अजून पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
वाई शहरात रविवार पेठेतल्या नागरिकांनी वाहने रात्री घरासमोर लावली होती.आज सकाळी वाहनाच्या काचा फुटल्याचे नागरिकांना दृष्टीस पडले.त्यात ओमीनी,स्विफ्ट,अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत.त्यामुळे नेमका कोणी हा प्रकार केला असावा याबाबत परिसरात चर्चा सुरु आहे. वाई शहरात यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नव्हता मात्र मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडलेल्या वाहनांच्या काचामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous Articleवर्ल्ड स्पर्धेत अर्हनने दाखवली कलेची झलक
Next Article खानापुरात भीषण अपघात दोन ठार









