दापोली :
तालुक्यातील अडखळ येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दापोली पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
याप्रकरणी योगेश धर्मराज चौगले (४१), ज्ञानेश्वर धर्मराज चौगले (४४, दोघेही रा. हर्णे मलखांब पेठ दर्शन), रमेश तबिब (२५) अंश जयेश चौगले (२०), भगवान लाया चौगले (४७, तिघेही रा. पाजपंढरी), निसार इस्माईल सोलकर (४८), शकूर ताहीर हासबा (४८), फरहान युनूस वाकणकर (४५), हुसेन मिया अली शानदार (५६), इरफान अहमद शिरगावकर (३८,पाचही रा. इरफान मोहल्ला अडखळ यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करीत आहेत.
अडखळ मोहल्ला येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या तुफान हाणामारी पश्चात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दोन्ही समाजातील प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत पश्चात परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. १७ जणांवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यातील काही जणांना जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
बुधवारी दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला येथे झालेल्या दोन गटांच्या हाणामारी पश्चात जिल्हा पोलीस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी दापोली दोन्ही गटांच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांनी हा कोणते प्रकारचा धार्मिक वाद नसल्याचे स्पष्ट केले.








