सर्वाधिक अर्ज साळ पंचायतीमधून
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील 17 पंचायतींपैकी 5 पंचायतींमधील 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी तथा मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्याकडे सादर केले. साळ पंचायतीमधून सर्वाधिक चार अर्ज सादर करण्यात आले. एकूण अर्जांची संख्या 12 झाली आहे. सोमवारी दोन उमेदवारी अर्ज सादर झाले होते.
साळ पंचायतीच्या प्रभाग 1 मधून वैष्णवी वासुदेव परब, प्रभाग 2 मधून गीता कालिदास राऊत, प्रभाग 3 मधून विशाल विठ्ठल परब, प्रभाग क्र. 5 मधून देऊ मधुकर राऊत. मेणकुरे धुमासेच्या प्रभाग क्र. 2 मधून संजना सुहास नाईक, दिपश्री दिलीप नाईक यांनी अर्ज सादर केले. नार्वे पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मधून पुनम पांडुरंग नार्वेकर. शिरगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 2 मधून अंकीता अच्य?त गावकर, वेदिका विनोद शिरगावकर. पिळगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 6 मधून अनिता अनिल सालेलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
तालुक्मयातील सर्व पंचायतींमधील या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या होण्याची चिन्हे दिसत आहे. अनेक पंचायतींमध्ये अद्याप उमेदवारही निश्चित झालेले नाहीत. अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजकीय नेते व विविध पक्षांच्या नेत्यांनीही आपापल्या समर्थनातील उमेदवार उतरविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.









