- 9 वी आणि 11 वी परिक्षेबाबत उद्या निर्णय
ऑनलाईन टीम / मुंबई :
दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. शिक्षण विभागाची बैठक संपली असून नववी आणि अकरावी परिक्षेबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दहावी आणि बारावी परीक्षेबाबत अजून निर्णय झालेला नाही, चर्चा अद्याप बाकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नववी आणि अकरावी परिक्षेबाबात ऊद्या संध्याकाळी निर्णय होणार आहे. तर, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अजून निर्णय झाला नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर चर्चा करून येत्या चार ते पाच दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्य सरकार आता काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रमोट करावे अशी मागणी केली आहे. मात्र, तसा काही निर्णय झाला नाही तर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार आहे.








