ऑनलाईन टीम / मुंबई
कोरोना संसर्गाने संपुर्ण मानवी जीवन विस्कळीत झाले आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोरोनाचा अनिष्ठ परिणाम मानवी जीवनावर घ झाला आहे. याला विद्यार्थी ही अपवाद ठरलेले नाहीत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवणीसह परीक्षांवर ही याचा परीणाम झाला. सुमारे दोन वर्षे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उस्थित न राहता अप्रत्यक्षरित्या शिकवण्या घेऊ लागले आणि परीक्षा ही याच प्रकारे होऊ लागल्या आहेत. याच बरोबर गेल्या दोन वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ही होऊ शकल्या नव्हत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास करण्यात आले होते.
गेल्या एक, दोन महिन्यापासून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा यंदा परीक्षा कशा पद्धतीने होणार याकडे लागल्या होत्या. अखेर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बोर्डाकडून आज सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकर जाहीर करण्यात आले आहे. 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत, तर 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. आता बोर्डाकडून परीक्षेचे प्रत्येक विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थी आपले वेळापत्रक हे अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकतात. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन ही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
आपले वेळापत्रक हे अधिकृत वेबसाईटवर देखील पाहू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.








