मुंबई
सेन्सेक्समधील 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवडय़ात वाढले असल्याचे दिसून आले आहे. भांडवलात 1,11,012.63 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक यांच्या भांडवल मूल्यात वाढ झाल्याचे दिसले आहे. आठवडय़ात फक्त रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवल मूल्य मात्र घसरलेले दिसले. टीसीएसचे बाजार भांडवल 24,635.68 कोटींनी वाढले होते.









