सिद्धार्थ मल्होत्रा अन् रश्मिका मंदाना यांचा चित्रपट
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट ‘मिशन मजनू’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर करत दिली आहे. चित्रपट 10 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. शांतनू बागची यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ हा रॉ एजंटच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

चित्रपटात सिद्धार्थसाबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. परंतु तिच्या भूमिकेसंबंधी निर्मात्यांनी खुलासा केलेला नाही. सिद्धार्थचा मागील चित्रपट ‘शेरशाह’ तर रश्मिकाचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या पार्श्वभूमीवर हे दोघेही एकत्र मोठय़ा पडद्यावर अभिनयाची जादू दाखविणार आहेत. हा चित्रपट 1970 च्या दशकात भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात करण्यात आलेल्या सर्वात साहसी मोहिमेवर बेतलेला आहे. या मोहिमेनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेक बदल घडून आले होते. या चित्रपटाची निर्मिती आरएसव्हीपी मूव्हीज बॅनर अंतर्गत अमर बुटाला, रॉनी स्क्रूवाला आणि गरिमा मेहता यांनी केली आहे.









