माजी मुख्यमंत्री एम. कऊणानिधी यांच्या नावे योजना सुरू
वृत्तसंस्था /कांचीपुरम
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वातील द्रमुक सरकारने राज्यात महिलांसाठी 1,000 ऊपयांची मासिक आर्थिक सहाय्य योजना सुरू केली. स्टॅलिन यांनी येथे योजना सुरू केली असून अनेक लाभार्थ्यांना बँकेचे डेबिट कार्ड वितरित केले आहेत. या योजनेला माजी मुख्यमंत्री एम. कऊणानिधी यांचे नाव देण्यात आले असून राज्य सरकारने ही मदत योजना महिलांचा ‘अधिकार’ असल्याचे म्हटले आहे. या योजनेअंतर्गत 1.06 कोटी महिलांना पात्र ठरवण्यात आले असून लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा 1,000 ऊपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यापूर्वी कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारनेही निवडणूक आश्वासन पूर्ण करत गेल्या महिन्यात गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत कर्नाटकात लाभार्थी महिलांना दरमहा 2 हजार रुपये दिले जातात. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 30 ऑगस्ट रोजी म्हैसूरमध्ये कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन केले होते. या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला आदी उपस्थित होते.









