मार्च तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारात म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीचा ओघ अलीकडे वाढला असल्याचे दिसले आहे. म्युच्युअल फंडमधून मार्च 2022 मधील तिमाहीत जवळपास 1.2 लाख कोटी रुपये काढण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मॉर्निंगस्टार इंडियाच्या एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.
यामध्ये लहान कालावधी आणि कॉर्पोरेट बॉण्ड यासारख्या खंडामधून खूप प्रमाणात रक्कम काढण्यात आली आहे. बाजारातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करुनच गुंतवणूक काढली जात असल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
यासोबतच या वर्गातील 2021-22 च्या दरम्यान एकूण काढण्यात आलेली रक्कम ही 68,471 कोटी रुपये झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 2.3 लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक आली होती.
समीक्षकांच्या माहितीनुसार फक्त ओव्हरनाईट कोषच्या खंडात 7,802 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. दरम्यान मार्च महिन्यामध्ये 1.15 लाख कोटी रुपये व फेब्रुवारी महिन्यात 8,274 कोटी रुपये मात्र काढण्यात आल्याचे सांगितले जाते. तर जानेवारीत देखील 5,087 कोटी रुपयांची गुंतवणूक आल्याची नोंद करण्यात आली आहे. बाजारातील स्थितीवर गुंतवणूकीची दिशा ठरेल.









