१ कोटींचा मुद्देमाल जप्त; राजस्थानमधील एक ताब्यात
प्रतिनिधी
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची गोव्याहून राजस्थानच्या दिशेने बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने इन्सुली येथे कारवाई केली. तब्बल ४८ हजार गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या ताब्यात घेतला. या कारवाईत १कोटी २ लाख ८हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी जगदीश देवाराम बिश्नोई (वय.४३रा.भाटीव, जिल्हा .जालोर, राज्य.राजस्थान) यास ताब्यात घेतले. ही कारवाई पहाटे पाचच्या सुमारास इन्सुली तपासणी नाका येथे करण्यात आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक वैभव वैद्य, निरीक्षक संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहा दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, दीपक वायदंडे, चालक रणजित शिंदे यांनी केली









