पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न
प्रतिनिधी
बांदा
आरोसबाग पूल ते बांदा रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी नाबार्ड मधून एक कोटी रुपये मंजूर झाले आहे या कामासाठी बांदा शहर भाजपच्या वतीने प्रयत्न केले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हे काम मंजूर करण्यात आल्याने ग्रामस्थाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
आरोसबाग पुलाचे काम मजूर झाल्यानंतर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात आले होते. मात्र बांदा ते आरोसबाग रस्त्याच्या काम मंजूर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती त्या पाश्वभूमीवर बांदा भाजपच्या वतीने त्यासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला होता. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्यासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला.









