वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी प्रमुख प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना कर्करोगाची बाध झाली असून गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट मंडळाने त्यांना वैद्यकिय इलाजासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली.
जय शहा यांनी अंशुमन यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड हे दोन वेळेला भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. 1974 च्या डिसेंबरमध्ये गायकवाड यांनी विंडीज विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 40 कसोटी आणि 15 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.









