बेळगाव-खानापूर तालुक्यातील परिस्थिती : बेळगाव तालुक्यात 344 विद्युतखांब मोडून नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 8 ते 10 दिवसांत बेळगाव व खानापूर तालुक्मयाला पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱयासह झालेल्या या दोन्ही तालुक्मयांमध्ये हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. विद्युतखांब, वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर यांचे नुकसान झाले असून यामुळे तब्बल 1 कोटी 78 लाख रुपयांचा फटका हेस्कॉमला बसला. यापैकी नुकसान झालेल्या साहित्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.
खानापूर तालुक्मयातील बरीचशी अशी गावे जंगलात असल्यामुळे झाडे पडून विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. 15 दिवस झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. मलप्रभा नदी तर दुथडी भरून वाहत होती. यामुळे खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात विजेचा लपंडाव सुरू होता. विद्युतखांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा करताना कर्मचाऱयांनाही तारेवरची कसरत करावी लागली. खानापूर तालुक्मयाच्या तुलनेत बेळगाव तालुक्मयात कमी प्रमाणात नुकसान झाले. बेळगाव शहरात तर चार ते पाच खांब वगळता इतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
1 ते 19 जुलै या दरम्यान हेस्कॉमने दिलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव तालुक्मयात 344 विद्युतखांब मोडून पडले. यापैकी 283 खांब पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहेत. यासाठी 34 लाख रुपयांचा खर्च आला. खानापूर तालुक्मयात 808 विद्युतखांबांचे नुकसान झाले असून 770 खांब पुन्हा उभे करण्यात आले आहेत. यासाठी 80 लाखांचा खर्च आला आहे.
बेळगाव तालुक्मयात 19 तर खानापूर तालुक्मयात 20 ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले. वीज पडल्याने तसेच ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी उतरल्याने झालेल्या शॉर्टसर्किट ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले. 58 लाख रुपये खर्च करून ट्रान्स्फॉर्मर पुन्हा बसविले आहेत. बेळगाव तालुक्मयात 4.32 कि. मी. तर खानापूर तालुक्मयात 3.95 कि. मी. च्या विद्युतवाहिन्या तुटून पडल्या. 4.96 लाख खर्च करून 8 कि. मी. पैकी 7 कि. मी. लांबीच्या विद्युतवाहिन्या आतापर्यंत सुरळीत करण्यात आल्या आहेत.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
जोरदार पावसामुळे बेळगाव व खानापूर तालुक्मयात हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. विद्युतवाहिन्या, खांब व ट्रान्स्फॉर्मरवर झाडे, फांद्या तसेच वीज पडल्यामुळे त्या निकामी झाल्या. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून केवळ 99 खांब बदलण्याचे काम शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
– प्रवीणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंता बेळगाव व खानापूर)
तपशील | बेळगाव | खानापूर |
नुकसान झालेले विद्युत खांब | 344 | 808 |
बदललेले विद्युत खांब | 283 | 770 |
नुकसान झालेले ट्रान्सफॉर्मर | 19 | 20 |
नुकसान झालेल्या विद्युत वाहिन्या (कि. मी. मध्ये) | 4.32 | 3.95 |
बदललेल्या विद्युत वाहिन्या (कि. मी. मध्ये) | 3.77 | 3.45 |