रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती
मुंबई :
भारताच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) यांची क्षमता ही प्रतिदिन 1 अब्ज व्यवहारांची होणार असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केला आहे. पेमेंट डिजिटल मिशनचा शुभारंभ करताना ते बोलत होते. आगामी काळात देशातील प्रत्येक नागरिकांना डिजिटल पेमेंटची ओळख करुन देणार असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी युपीआय अंतर्गत दैनंदिन व्यवहार 26 कोटी होत आहेत. परंतु प्रणालीची क्षमता ही दररोज 100 कोटी व्यवहारांची आहे. अशा प्रकारे नवीन ग्राहकांना युपीआय प्लॅटफॉर्मसोबत जोडण्याची कसरत सुरु असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.









