विक्रीचा आकडा फाडाच्या अहवालामधून सादर : मारुतीची नोव्हेंबरमध्ये उच्चांकी कामगिरी
नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान देशभरात 1.8 कोटी वाहनांची विक्री झाली आहे. त्यात वार्षिक स्तरावर 11 टक्के विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये एकट्या दुचाकी विभागात 1.33 कोटी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ती 14 टक्के जास्त होती.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 11.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत दुचाकी श्रेणीमध्ये 26 लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली, जी नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 15.80 टक्के अधिक आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन (फाडा) ने आर्थिक वर्ष 2025 आणि नोव्हेंबर 2024 मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांचा विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. .
नोव्हेंबरमध्ये हिरोने सर्वाधिक 9,15,468 दुचाकी विकल्या. या श्रेणीतील सर्वाधिक वाहने विकणारी कंपनी 35 टक्केसह अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, मारुती सुझुकीने 1,28,521 कारची विक्री करून 39.92 टक्के वाटा घेऊन प्रवासी वाहन विभागात अव्वल स्थान पटकावले.









