राधानगरी/महेश तिरवडे
Radhanagari Dam News : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही या वर्षी पाण्याची जादा मागणी वाढल्याने गत सात वर्षाच्या तुलनेत पाण्याची नीचांकी पातळी गाठली आहे. यावर्षी वळीव सदृश व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. याचा परिणाम शेती व नागरी जीवनावर होत आहे. या वर्षी मृग नक्षत्र निघून पंधरा दिवस पूर्ण होत आहेत मात्र अद्यापही पावसाने ओढ दिल्याने राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्हाच्या बळीराजा चिंतेत पडला आहे. यावर्षी पावसाळा लांबणीवर पडल्यास पाणी टंचाई निर्माण होणार आहे, यासाठी आगामी काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
गेल्या वर्षी राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होऊन 18 जून 64-85 द. ल. घ. फूट इतका पाणीसाठा उपलब्ध होता. तर पाणीसाठा(2-29 टीएमसी) इतके पाणी शिल्लक होते. मात्र, यावर्षी पाणी साठा (1- 73 टीएम सी) शिल्लक आहे. सध्या पाण्याच्या मागणी नुसार भोगावती नदीपात्रात 500 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. तुळशी धरणात गेल्या वर्षी (42-19) द. ल. घ. मी शिल्लक होता (1-49) टीएम सी पाणी शिल्लक होते. मात्र, यावर्षी (26-36) द. ल. घ. मी तर (0-93) टीएमसी शिल्लक आहे.दुधगंगा धरणात गेल्या वर्षी (178-28) द. ल. घ. मी पाणी होते तर (6-29) टीएमसी शिल्लक होते. तर या वर्षी (39-29) द. ल. घ. मी पाणी साठा शिल्लक होता यावर्षी (1-39 )टीएमसी पाणी शिल्लक आहे. तुळशी नदीतून 200 क्यूसेक व दुधगंगा नदीतून 300 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.साधारणपणे गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या या तीन धरणात कमी पाणी साठा उपलब्ध आहे.

यावर्षी पाणी साठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने धरणातून मागणीनुसार कमी अधिक प्रमाणात पाणी भोगावती नदी पात्रात सोडले जाते.पावसाळा सुरू होऊनही पावसा अभावी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. सध्या राधानगरी, काळमावाडी, तुळशी या तीन धरणातील पाणीसाठा पूर्णपणे खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्नही ऐरिणीवर आला आहे. आणखीन काही दिवस पाऊस न पडल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.









