चार ते आठ आठवडय़ांनी बंद वाढल्यास 90 टक्के रोजगार जाण्याची भीती
वृत्तसंस्था /. नवी दिल्ली
भारतामध्ये जवळपास 69 दशलक्ष (6.9 कोटी) अति लहान, लहान आणि मध्यम एटरप्राईजेस म्हणजे उद्योग लॉकडाउनचा कालावधीत आणखीन वाढल्यास बंद होण्याचे संकेत आहेत. ग्लोबल अलायन्स फॉर मास एटरप्रिन्योरशिप (जीएएमइ) चे अध्यक्ष रवि वेंकटेसन यांच्या माहितीनुसार संचारबंदीचा कालावधी जर 4 ते 8 आठवडय़ांनी आणखीन वाढल्यास 1.7 कोटी एमएसएमइ दुकाने बंद होण्याचे होण्याचे अनुमान मांडले आहे. ऑल इंडियन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या आकडय़ानुसार वेंकटेसन यांनी सांगितले की कोरोनाचे संकट चार ते आठ महिन्यांपर्यंत वाढल्यास देशातील 19ते 43 टक्क्मयांपर्यंतची एमएसएमइ दुकांने बंद होण्याची शक्मयता आहे.
आर्थिक सहाय्य देणार
इन्फोसिसचे सह अध्यक्ष आणि बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष वेंकटेसन यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जीएमइच्या संकटात लहान व्यवसायांना वाचविण्यासाठी जवळपास 100 दशलक्ष डॉलर निधी उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हा निधी येत्या दोन आठवडय़ात सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
रोजगारावर परिणाम
भारतात एमएसएमइ क्षेत्रातील जवळपास 90 टक्के रोजगार जाण्याचे संकेत लॉकडाउन वाढल्यास ही स्थिती तयार होऊ शकेल. वेंकटेसन यांच्या माहितीनुसार एमएसएमइच्या प्रत्येक क्षेत्रातील रोजगारात कपात करण्याचा अंदाजही आहे.
4 कोटी लोकांना रोजगार देणाऱया हॉस्पिटॅलिटी उद्योगात जवळपास 1.2 कोटी रोजगार बुडण्याचे अनुमानासोबत 4.6 कोटी नागरिकांना रोजगार देणाऱया रिटेल क्षेत्रातून 1.1 कोटी रोजगार जाण्याची भीती आहे.
सर्वाधिक उद्योग देणारे क्षेत्र
भारतात एकूण वर्कफोर्समध्ये 93 टक्के म्हणजे जवळपास 400 दशलक्ष लोकांचे मुख्य अस्थायी क्षेत्रात येत आहेत. ज्यामध्ये 93 दशलक्ष लोकांना हंगामी रोजगार उपलब्ध होत असतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे यांचे रोजगार बंद होण्याची भीती आहे.