मुंबई
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी मारूती सुझुकीच्या सीएनजी कार्सच्या विक्रीत चांगली वाढ दिसली आहे. सदरच्या कालावधीत कंपनीने 1.57 लाखहून जास्त सीएनजी कार्स विक्री करण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंतच्या मागील वर्षांचा आढावा घेतल्यास ही मागच्या आर्थिक वर्षातील सर्वाधिक विक्रीसंख्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने 2020-21 मध्ये 1 लाख 57 हजार 954 एस-सीएनजी कार्सची विक्री केली आहे.









