रिलायन्सला मूल्यात फटका: बाजार होता दबावात : सेन्सेक्स 237 अंकांनी घसरणीत होता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1.55 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज आणि भारती एअरटेल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या आठवड्यात 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 55 हजार 721 कोटी रुपयांनी घसरणीत राहिले होते. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक मागच्या आठवड्यात 237 अंकांनी घसरणीत होता.
यांचे मूल्य घटले
रिलायन्स, भारती एअरटेलसह आयसीआयसीआय बँक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया यांचेही मूल्य कमी झालेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार भांडल मूल्य 74,564 कोटी रुपयांनी कमी होत 17 लाख 37 हजार 566 कोटी रुपयांवर राहिले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 26,274 कोटी रुपयांच्या घसरणीसह 8 लाख 94 हजार 24 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 22,254 कोटींनी घटत 8 लाख 88 हजार 432 कोटींवर तर आयटीसीचे बाजार मूल्य 15,449 कोटींनी कमी होत 5 लाख 98 हजार 213 कोटी रुपयांवर राहिले होते. विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसीचे बाजार मूल्य 9930 कोटींसह कमी होत 5 लाख 78 हजार 579 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 7248 कोटींनी घटत 5 लख 89 हजार 160 कोटी रुपयांवर घसरले होते.
यांचे भांडवल मूल्य वाढले
तर काही कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात वाढ झालेली दिसली. यात टीसीएसचे 57,744 कोटींसह 14 लाख 99 हजार 697 कोटींवर आणि इन्फोसिसचे 28,838 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 60 हजार 281 कोटी रुपयांवर तर स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 19,812 कोटींच्या वाढीसह 7 लाख 52 हजार 568 कोटी रुपयांवर पोहचले आहे.









