वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात नुकत्याच संपलेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्यावषी म्हणजे फेब्रुवारी-2022 मध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर हे संकलन 12 टक्क्मयांनी वाढले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी फेब्रुवारी महिन्याची जीएसटी आकडेवारी जाहीर केली.
जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी वाढ झाली होती. यामध्ये सलग अकराव्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी महसूल प्राप्त झाला. जानेवारी महिन्यात सरकारला 1,55,922 कोटी रुपये म्हणजेच 1.55 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन मिळाले होते. त्यातच आता फेबुवारी महिन्यातील संकलनही बऱयापैकी झालेले दिसत आहे. सलग बाराव्या महिन्यात मासिक जीएसटी संकलन 1.40 लाख कोटींहून अधिक झाले आहे.
फेबुवारी महिन्यात उपकर म्हणून 11,931 कोटी रुपये जमा झाले असून हे संकलन जीएसटी लागू झाल्यानंतरची सर्वोच्च पातळी असल्याचे अर्थ मंत्रालयाने बुधवारी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करताना सांगितले. मात्र, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसुलात घट झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 27,662 कोटी रुपये आहे तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) संकलन 34,915 कोटी रुपये आहे. या संयुक्त जीएसटी (आयजीएसटी) 75,069 कोटी रुपये प्राप्त झाला आहे. याशिवाय 11,931 कोटी रुपयांच्या उपकराचाही समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवस असल्याने जीएसटी संकलन इतर महिन्यांच्या तुलनेत किंचित कमी दिसून येत आहे.









