हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलंगणातील हैदराबाद विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱयांनी शनिवारी 1 कोटी 37 लाख रुपयांचे सोने जप्त केले. दुबईहून येणाऱया प्रवाशाला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून 1.5 किलो वजनाचे 24 कॅरेट सोने आणि 1.4 किलो वजनाचे 18 कॅरेट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती हैदराबादच्या सीमाशुल्क उपायुक्तांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. संबंधिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.









