इस्तंबुल
तुर्कस्तानातील मुस्लिमांच्या एका पंथाचा नेता अदनान ओकतार यांना इस्तंबुलच्या न्यायालयाने 10 विविध गुन्हय़ांकरता 1075 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 2018 मध्ये देशभरात टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ओकतार यांच्या अनुयायांना अटक करण्यात आली होती. अदनानवर लैंगिक शोषण, फसवणूक आणि हेरगिरी करण्याचा आरोप होता.
सुनावणीदरम्यान अदनानविषयी अनेक गुपिते तसेच क्रूर लैंगिक गुन्हय़ांचा खुलासा झाला आहे. आपल्या 1000 प्रेयसी असल्याचे अदनानने सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले होते. या वादग्रस्त पंथाचा अदनान 1990 च्या दशकात नेता झाला होता. 2011 साली अदनानच्या घरातून 69 हजार गर्भनिरोधक गोळय़ा मिळाल्या होत्या.









