प्रतिनिधी /मडगाव
एक लाख रुपये किंमतीची बुलेट मोटरसायकलची चोरी केल्याच्या आरोपावरुन कुंकळी पोलिसांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱया एका कामगाराला जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आपली बुलेट मोटरसायकलची चोरी झाली असल्याची तक्रार सावर्डे येथील सत्येंद्र देसाई यांनी कुंकळी पोलीस स्थानकात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस तपास सूर झाला तेव्हा मूळ उत्तर प्रदेशातील व सध्या कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत राहात असलेल्या निरज सिंग या 23 वर्षीय आरोपीला जेरबंद केले.









