सातारा जिल्ह्यातील एपीआयची मुंबईत दमदार कामगिरी
प्रतिनिधी/सातारा
1 कोटी 80 लाखाच्या कोकेन बाळगल्याप्रकरणी एका परदेशी नागरिकास अटक करण्यात आली. डॅझी अमानी एमसुकू (वय 42, हल्ली रा.खारघर, मुळ रा. टांझानिया) असे या अटक केलेल्या परदेशी नागरिकाचे नाव आहे.
पाटण तालुक्यातील कडवे गावचे सुपुत्र सचिन कदम हे आझाद मैदान युनिटला आहे. त्यांनी मुंबईत दमदार कामगिरी केली असून त्यांच्या पथकातील हवालदार बनकर यांना शुक्रवार (दि. 16) रोजी खास खबऱ्याकडून माहिती मिळाली की अंमली पदार्थाची तस्करी होणार आहे. त्या अनुषंगाने वरीष्ठांना कल्पना देवून वरीष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे, हवालदार बनकर, पो. ना.चव्हाण, पो. शिपाई भावसार, इघे, निंबाळकर यांनी सापळा रचून काल, शनिवार, (दि. 17) रोजी डॅझी अमानी एमसुकू याला अटक करुन त्याच्याकडून 1 कोटी 80 लाख रुपयांचा कोकेन जप्त केला. तो कोकेनची खरेदीविक्री करत असून एक मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांनी एपीआय सचिन कदम यांच्या व त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









