अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्यव्यवसायिकांच्या नुकसानीपोटी मदत
प्रतिनिधी / सांगली
जुलै 2021 मधील अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्यव्यवसायिकांच्या नुकसानीसाठी एस.डी.आर.एफ. च्या दराने व वाढीव दराने मदत देण्यासाठी एकूण 1 कोटी 52 लाख 16 हजार इतके प्राप्त अनुदान सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सांगली यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीव्दारे वितरीत करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंजुरी दिली आहे. हा निधी संबंधित बाधितांना तात्काळ शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
या निधीची संबधित मत्स्यव्यवसाय बाधितांच्या बँक बचत खात्यात थेट रक्कम जमा करण्यात यावी, कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत करण्यात येवू नये. मत्स्यव्यवसाय नुकसानी बाबतची मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. कोणत्याही परिस्थितीत ही रक्कम बँकेत वाटप विना पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Previous Articleनवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Next Article सोमय्यांची आता जरंडेश्वर कारखान्यावर स्वारी








