ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमुळे अनेक जण देशातील वेगवेगळ्या भागात अडकून पडले होते. मात्र, लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात काही नियम शिथिल करून या अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भारतीय रेल्वेने 1 मे पासून आता पर्यंत 3,276 विशेष ट्रेन मधून जवळपास 42 लाख प्रवासी मजूरांना त्यांच्या गावी सोडले आहे. अधिकृत माहिती नुसार, 2,875 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून आता 401 ट्रेन चालवल्या जात आहे.
यामध्ये आता पर्यंत विशेषतः पाच राज्यात अधिक संख्येने ट्रेन चालवल्या गेल्या. यामध्ये गुजरातमध्ये 897, महाराष्ट्रात 590, पंजाबमध्ये 358, उत्तर प्रदेशात 232 आणि दिल्लीत 200 ट्रेन्सचा समावेश आहे.
तर ज्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ट्रेन रद्द करण्यात आल्या त्यामध्ये उत्तर प्रदेशात 1,428, बिहार 1,178, झारखंड 164, ओडिशा 128 आणि मध्य प्रदेश मधील 120 ट्रेन चा समावेश आहे.
भारतीय रेल्वेने प्रत्येक ट्रेन चालण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 85 टक्के भार उचलला आहे तर अन्य 15 टक्के भाड्याच्या रूपात राज्यांकडून घेतला आहे.