रत्नागिरी :
शहरातील मिरकरवाडा येथे उपचारासाठी पैशाची गरज असल्याची बतावणी करुन 53 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 5 मे 2022 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यानच्या काळात घडल़ी अल्ताफ हाशमत साखरकर (36, ऱा धनजी नाका, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुह्याची नोंद केल़ी
अब्दुलसमद अलिमियाँ जयगडकर (ऱा मांडवी रोड, रत्नागिरी) व प्रमिला हिंदुराव माटेकर (ऱा शिवाजीनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ संशयित आरोपी व तक्रारदार हे एकमेकांच्या ओळखीत आहेत़ संशयित आरोपींनी सना शेख नावाच्या व्यक्तीला उपचारासाठी पैशाची गरज असल्याची बतावणी करुन पैसे पाठवण्यास सांगितल़े त्यानुसार अल्ताफ यांनी 5 मे 2022 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत आरोपी यांना वेळोवळी एकूण 53 लाख 13 हजार 500 ऊपये गुगल पे द्वारे पाठवल़े दरम्यान संशयित आरोपींच्या ओळखीत सना शेख नावाची व्यक्तीच नसून खोटे सांगून आपल्याकडून पैसे उकळण्यात आले, असे तक्रारदार यांना समजून आल़े त्यानुसार त्यांनी संशयित आरोपी यांच्याकडे पैशाची मागणी केल़ी मात्र आरोपी हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तक्रारदारांनी दोन्ही संशयितांविऊद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी संशयितांविऊद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 318 (2), 351 (2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा








