विटा :
कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी बाहने व कामगार पुरवतो, असे सांगून नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर फ्युएल साखर कारखान्याची तब्बल ३ कोटी ८१ लाख ५५ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद बिटा पोलिसांत दाखल झाली आहे. याप्रकरणी भारती शुगर्स फ्युएल्सचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. एकूण ३२ जणांवर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी यांनी २३ जून २०२३ ते वेळोवेळी नागेवाडी कारखाना येथे येवून कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी बाहने व कामगार पुरवतो, असे सांगून कारखान्याचा विश्वास संपादन केला. कारखान्याकडून वेळोवेळी ३ कोटी ८१ लाख ५५ हजार २०० रुपये स्वतःच्या बँक खात्यावर आणि रोख स्वरुपात घेतले. परंतु कारखान्यास कोणत्याही प्रकारे बाहन आणि कामगार पुरवले नाहीत. कारखान्याची या ३२ संशयितांनी आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हंटले आहे.
याबाबत पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या सुचनेनुसार संबंधित ३२ संशयितांबर बिटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. गोरखनाथ इराप्पा गोपणे, सुखदेव कृष्णा करे, रामु आप्पाराय बळुर, दामाजी बिराप्पा कोळेकर, बाळु आमोगसिध्द माने, बबन हणमंत कोळेकर, पाटलु बाबु तांबे, संभाजी ताय्याप्पा गडदे, अरुण जयराम लोहार, आकाश प्रकाश बळूर (सर्व रा. : जत), चंद्रकांत रेखु राठोड, यादव गिण्यानदेव चव्हाण, गहिणीनाथ रावसाहेब नागरगोजे, राणु मर्निक डोंगरे (सर्व रा. जिल्हा : बीड), शाहरुख रसुल मुढे, भाग्यश्री संजय कबाडे, हणुमंत सुरेश सरडे, विक्रम अर्जुन ढावरे, हणुमंत मल्हारी फलफले, गणेश रमेश कुंभार (सर्व रा. जिल्हा : सोलापूर), नामेदव पुंडलीक भोरे, बालाजी श्रीकांत करळे, लक्ष्मण सौदागर गोरे (सर्व रा. जि धाराशिव), प्रेमसिंग केशव चव्हाण (रा. तोडगांव ता जि वाशिम), एकनाथ जेमा राठोड, बाळु सुर्यभान मोरे, हरिभाऊ आंबादास दाभाडे (सर्व रा. जिल्हा : नाशिक), अवधुत सर्जेराव पाटील (रा. इंदापुर ता. इंदापुर, जि पुणे), कृष्णात शशिकांत पाटील, प्रविण भानुदास पाटील, अक्षय बजरंग पाटील, दुर्योधन शामराव सावंत (सर्व रा.जि सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.








