कोल्हापूर / विनोद सावंत :
गेल्या चार वर्षात मुद्रांक शुल्कच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातून राज्य शासनाच्या तिजोरीत तब्बल 1860 कोटी जमा झाले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात कोल्हापूरच्या मुद्रांक शुल्क विभागातून विक्रमी 541 कोटी 81 लाख इतका विक्रमी महसुल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्क दिलेले टार्गेट आणि झालेली वसुली यामध्ये कोल्हापूर राज्यात टॉपवर आहे.
राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्राsत असणाऱ्या विभागापैकी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा एक आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून मुद्रांक शुल्क जमा होतो. मार्चमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क जमा करण्यासाठी गर्दी झालेली असते. कोल्हापूर जिल्हा नेहमी मुद्रांक शुल्क वसुलीत टॉपवर राहिला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाने 541 कोटींचा महसुल जमा झाला आहे. 88 हजार 581 दस्तांची नोंदणी झाली आहे.
कोल्हापूर मुद्रांक विभागास 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 525 कोटींचे टार्गेट दिले होते. यावेळी टार्गेटपेक्षा जास्त म्हणजेच 532 कोटींची वसुली केली होती. यामुळे शासकीय पातळीवर कोल्हापूर विभागाचा सत्कारही केला होता. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 640 कोटींचे टार्गेट दिले होते. यापैकी 541 कोटींची जमा झाली आहे. यंदा जरी उद्दीष्टे पूर्ण झाले नसले तरी विक्रमी 541 कोटी मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. राज्यभरात 35 हजार 858 कोटी 54 लाख इतका मुद्रांक शुल्क जमा झाला आहे.
- गतवर्षीच्या तुलनेत कमी दस्त नोंदणी
गतवर्षी राज्यशासनाने कोल्हापूर विभागाला 525 कोटींचे टार्गेट दिले होते. यावेळी 532 कोटी महसुल जमा झाला तर 96 हजार 639 दस्त नोंदणी झाली होती. यंदा 541 कोटींचा मुद्रांक शुल्क आणि 88 हजार 581 दस्त नोंदणी झाली आहे.
- पुढील वर्ष मुद्रांक शुल्कच्या वसुलीत आणखीन वाढ होणार
कोल्हापूरचा रेडिरेकरन 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रासह अन्य कामांसाठी 100 रूपये ऐवजी आता 500 रूपयांचा स्टॅम्प वापरण्याचा निर्णय राज्यशासनानी घातली आहे. त्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातून 600 कोटींचा मुद्रांक शुल्क वसुल होण्याची शक्यता या तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
- रेडीकेरनर वाढीची धास्ती, महिन्यांत 79 कोटींची जमा
1 एप्रिल 2025 पासून रेडिरेकनर (बाजारमुल्य) 10 ते 15 टक्के वाढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळेच मार्चमध्येच अनेकांनी खरेदी–विक्रीचे व्यवहार केले. यामुळेच एका मार्च महिन्यांतच 79 कोटींचा मुद्रांक शुल्क जमा होवू शकला.
- वाढवलेल्या वेळेचा फायदा झाला….
कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी टार्गेटपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क जमा होतो. यंदा जरी टार्गेटपेक्षा महसुल कमी जमा झाला असला तरी विक्रमी 541 कोटी जमा झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाने केलेल्या कामगिरीमुळे हे शक्य झाले. मार्च महिन्यात कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढवली होती. रात्री सव्वा आठ वाजेपर्यंत कार्यालय सुरू होती. याचाही वसुलीसाठी फायदा झाला.
बाबासाहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर
- चार वर्षातील मुद्रांक शुल्क वसुली स्थिती
आर्थिक वर्ष उद्दिष्टे नोंदणी झालेले दस्त वसुली
2021-22 329 कोटी 68878 330 कोटी 26 लाख
2022-23 350 कोटी 86795 456 कोटी 20 लाख
2023-24 525 कोटी 96639 532 कोटी 56 लाख
2024-25 640 कोटी 88581 541 कोटी 81 लाख
महिना जमा मुद्रांक शुल्क
एप्रिल 2024 29 कोटी
मे 39 कोटी
जुन 45 कोटी
जुले 40 कोटी
ऑगस्ट 41 कोटी
सप्टेंबर 31 कोटी
ऑक्टोंबर 45 कोटी
नोव्हेंबर 30 कोटी
डिसेंबर 32 कोटी
जानेवारी 35 कोटी
फेब्रुवारी 44 कोटी
मार्च 79 कोटी








