- बेळगाव / प्रतिनिधी
- कन्नड-मराठी फलक प्रकरणामुळे सीमाभागासह महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, रविवारी ही आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
- कर्नाटक-महाराष्ट्र असा दैनंदिन प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेळगाव विभागाच्या एकूण महसुलापैकी 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळतो. मात्र, आंतरराज्य बससेवा सातत्याने ठप्प होत असल्याने दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांना याचा फटका बसत आहे. बेळगावसह संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, गोकाक आदी आगारांतून महाराष्ट्रात धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे महसूल चांगला मिळतो. मात्र, आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याने या सर्व आगारांना फटका बसला आहे.
Previous Articleलस घेतल्यानंतरही इम्रान खान ‘पॉझिटिव्ह’
Next Article जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा इशारा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.