ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्स सरकारने ॲस्ट्राझेनेकाच्या लसीकरणासाठी वयोमर्यादेचे बंधन घातले आहे. या देशात आता 55 वर्षांपुढील व्यक्तींनाच ही लस दिली जाणार आहे.
ॲस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर फ्रान्ससह युरोपातील डझनभर देशांनी या लसीवर तात्पुरती बंदी घातली होती. युरोपियन मेडिकल एजन्सीने ॲस्ट्राझेनेकाची लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर फ्रान्ससह काही युरोपातील देशांनी या लसीचा वापर पुन्हा सुरू केला.
मात्र, फ्रान्सने या लसीचे लसीकरण सुरू करताना नियमांमध्ये बदल केले आहेत. या देशात ॲस्ट्राझेनेकाची लस केवळ 55 वर्षावरील व्यक्तींनाच दिली जाणार आहे.









